नशामुक्ती केंद्राला लागलेल्या आगीत 17 ठार 12 जखमी-इक्वॅडोरमधील दुर्घटना

क्‍यूटो (इक्वॅडोर): एका नशामुक्ती केंद्राला लागलेल्या आगीत जण 17 ठार 12 जखमी झाले आहेत. इक्वॅडोरमधील गुआयाकिल शहरात शुुक्रवारी ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. गुआयाकिल हे इक्वॅडोरमधील सर्वात मोठे शहर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या काही जणांनी तेथून पळून जाण्याच्या उद्देशाने तेथील गाद्यांना आग लावली. ही आग वेगाने पसरून नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यात 17 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 12 जण जखमी झाले.

ज्या नशामुक्ती केंद्राला आग लागल्याने 17 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, ते नशामुक्ती केंद्र बेकायदेशीर असल्याची माहिती पोलीस प्रमुख तानिया वरेला यांनी दिली आहे. नशामुक्ती केंद्र चालवण्यासाठी लागणारी आवश्‍यक परवानगी सदर नशामुक्ती केंद्राच्या मालकांनी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. इक्वॅडोरमध्ये अशा प्रकारची अवैध नशामुक्ती केंद्रे मोठ्या संख्येने असल्याचे माहितीही त्यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुआयाकिलमधील नशामुक्ती केंद्राच्या आगीत मरण पावलेल्यांबद्दल अग्निशामक दलाने एका निवेदनाद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. या प्रकरणी दाखवलेल्या बेपर्वाईबाबत नशामुक्ती केंद्राच्या संचालकांना अटक करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)