फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या पिस्तुलासह १७ किलो हेरॉईन जप्त

चंदिगढ : सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज पंजाब येथील भारत-पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर भागामध्ये १७ किलो हेरॉईन आणि पाकिस्तानी बनावटीचा पिस्तूल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या कारवाई मध्ये बीएसएफने ३ मॅगझीन आणि २७ जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत.

काही संशयित हालचालींमुळे सीमा सुरक्षा दलाकडून भारत-पाकिस्तान सीमेनजीक शोध मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २०१८ या वर्षांमध्ये सीमा सुरक्षा दलाकडून आतापर्यंत २२१.३०५ किलो हेरॉईन जप्त केल्याची माहिती देखील या अधिकाऱ्याने दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)