17 क्रमांकाच्या फॉर्मची मुदत वाढली

पुणे – दहावी व बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म क्रमांक 17 भरण्याच्या अर्जास मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांना 10 व 12 परीक्षेसाठी आता 6 नोव्हेंबरपर्यत अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

फेब्रुवारी-मार्च 2019मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज (फॉर्म क्रमांक 17) ऑनलाइन प्रक्रियेद्वारे स्वीकारण्याचा यापूर्वीचा अंतिम दिनांक दि. 19 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर अशी होती. त्यानंतर आता बोर्डाने दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारून अर्ज करण्याची सुविधा दि. 26 ऑक्‍टोबरपासून सुरू उपलब्ध करून दिली असून, 6 नोव्हेबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांनी http://form.mh-ssc.ac.inhttp://form.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठी सूचना संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरूनही नोंदणी शुल्क जमा न केलेल्या विद्यार्थ्यांनी नव्याने ऑनलाइन अर्ज भरून सर्व विहित प्रक्रिया करणे अनिवार्य राहील, असेही भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)