केरळमधील मृतांची संख्या १६७, पंतप्रधान मोदी करणार दौरा

केरळमधील अतिवृष्टी आणि पूर यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तर झालीच आहे त्याचबरोबर जीवितहानीदेखील झाली आहे.  ताज्या आकडेवारीनुसार १६७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  या भीषण घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळचा दौरा करणार आहेत.

केरळमधील हा पाऊस येथील सरासरीच्या १० पट जास्त आहे. अतिवृष्टीमुळे तेथील अनेक नद्यांना पूर आला आहे. पेरियर नदीला पूर आल्याने त्रिसुर जिल्ह्यातील चालकुडी हे पूर्ण शहर पाण्याने व्यापले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अंत्यविधी संपल्यानंतर नरेंद्र मोदी केरळला जाणार आहेत.

केरळ येथील  हवामान खात्याने  १४ पैकी १३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा  इशारा दिला आहे. तर इडुक्की येथील परिस्थिती सर्वात गंभीर असू शकते. संध्याकाळपर्यंत नेसर्गिक आपत्ती नियंत्रणच्या ३५ टीम तेथे पोहचण्याचे  आदेश आहेत तर सध्या तेथे नवीन १२ टीम कार्यरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)