1,657 मोबाइल टॉवर्स अनधिकृत

जबाबदार कोण? : महापालिका प्रशासनाचा धक्कादायक खुलासा


650 कोटींची मिळकतकर थकबाकी


फक्‍त 238 टॉवर्सच आहेत नियमानुसार

पुणे – महापालिकेच्या नियमांना हरताळ फासत शहरात उभारण्यात आलेल्या 1 हजार 895 मोबाइल टॉवर्सपैकी तब्बल 1 हजार 657 टॉवर्स अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर, महापालिकेची मान्यता घेऊन फक्‍त 238 टॉवर्सच नियमानुसार, उभारण्यात आलेले आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी प्रश्‍नोत्तरात याबाबत माहिती विचारली होती. त्याला हे लेखी उत्तर देण्यात आले आहे. भानगिरे यांनी टॉवर्सबाबत वेगवेगळी माहिती विचारली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या हद्दीमध्ये विविध मोबाइल कंपन्याचे इमारतीचे छत आणि जमिनीवर अनधिकृत मोबाइल टॉवर्सची संख्या लक्षणीय आहे. याबाबत महापालिका मुख्यसभेत अनेकदा प्रश्‍नही उपस्थितीत करण्यात आलेले असले, तरी या टॉवर्सबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या कंपन्यांकडे मिळकतकराची तब्बल 650 कोटींची थकबाकी आहे.

याबाबत भानगिरे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना, प्रशासनाने अधिकृत मोबाइल टॉवरला परवानगी देताना “स्क्रूटनी फी’ 600 रुपये, एकरक्कमी प्रशासकीय शुल्क 30 हजार रुपये, बांधकाम विकसन शुल्क इमारतीवरील मोबाइल टॉवर बांधकामासाठी शिघ्रसिद्धगणक दराच्या 40 टक्‍क्‍यांपैकी 8 टक्केनुसार आकारले जाते. मोकळया जागेवर मोबाइल टॉवर असल्यास 8 टक्केपैकी जागेचा शिघ्रसिद्धगणक दराच्या नुसार आकारले जाते. त्यानुसार, पालिकेने दिलेल्या परवानगीतून मोबाइल टॉवरच्या माध्यमातून 7 कोटी 24 लाख रुपये उत्पन्न्न मिळाले आहे. मोबाइल टॉवरच्या मिळकतकराच्या माध्यमातून मिळकत करातून 31 कोटी 36 लाखांचे उत्पन्न्न मिळाल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहेत. तर, शहरात विविध मोबाइल कंपन्यांच्या टॉवर्सपासून त्रास होत अल्याबद्दल 1 एप्रिल 2018 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत 10 नागरिकांनी तक्रार अर्ज केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)