राजस्थानात स्वाईन फ्लूचे 164 बळी 

जयपूर: राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातले असून सप्टेंबर महिन्यात तब्बल 164 जणांचा बळी घेतला आहे. तर स्वाईन फ्लूचे 1,652 रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती एनसीडीसीकडून देण्यात आली आहे. या वर्षभरात देशभरात एकूण 4,484 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची नोंद आहे. यातील 353 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानमधील जयपूर शहरात 9350 जणांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील 36 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. कोटा येथे 23, तर बरण जिल्हयात 15 जण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत.
राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यत 1167 रुग्ण आढळले असून यातील 101 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 786 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 30 जणांचा बळी गेला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)