टेंडरच्या नावाने 16 हजारांची फसवणूक

सातारा- कंपनीला दुचाकी गाड्या लागणार आहेत असे सांगुन टेंडरसाठी 16 हजार रुपयांची मागणी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तेजस शहा याने सातारा शहरातील निर्मल बजाज या दुचाकी शोरूमच्या मालकाला फोन करून 16 गाड्या लागणार असल्याचे सांगितले. त्यावेळी शहा याने आपण डॉमिनोझ पिझ्झाच्या भोर शाखेतून बोलत असल्याचे नमुद केले. भोर शाखेला पिझ्झा डिलेव्हरीसाठी 16 दुचाकी लागणार असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी तक्रारदार धनंजय तरटे यांनी नंबर कुठून मिळाला असे विचारले. तेव्हा जस्ट डाईलवरून घेतल्याचे शहा याने सांगितले.

-Ads-

त्यानंतर तक्रारदार यांनी त्याच्या मागणीचा तपशील मेलवरून पाठवला. मेल पाठवल्यानंतर तक्रारदाराने टेंडर फॉर्मची मागणी केली. तेव्हा संशयीताने त्यासाठी प्रथम तुम्हाला टेंडर फी म्हणून 16 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी शहाच्या बॅंक खात्यावर 16 हजार भरले. पैसे भरल्यानंतर त्यांनी शहाला टेंडर फॉर्मसाठी विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या बाबतची तक्रार धनंजय काशीनाथ तरटे रा. खेड यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. दाखल तक्रारीचा तपास पोलिस करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)