पुणे – पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गुरुवारी शहरातील 16 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम -1951 मधील कलम 22 (आय) आणि कलम 22 (एन) मधील तरतुदीनुसार या बदल्या करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर राहुन कार्यभार स्वीकारावा, असे आदेश पोलीस उपायुक्त (मुख्यालय) स्वप्ना गोरे यांनी काढले आहेत. सध्या पोलीस प्रशासनाने बदल्यांचा धडाका लावला आहे.