पाकिस्तानकडून 16 भारतीय मच्छिमारांना अटक 

कराची – पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या तीन नावाही जप्त करण्यात आल्या. भारतीय मच्छिमारांनी पाकिस्तानी सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश केल्याचा कांगावा त्या देशाच्या यंत्रणेने केला. भारतीय मच्छिमारांना सोमवारी पकडण्यात आल्याचे समजते. त्यांना नंतर पाकिस्तानी पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले.

भारत आणि पाकिस्तानमधील सागरीसीमा निश्‍चित करणाऱ्या योग्य तंत्रज्ञानाच्या अभावामुळे दोन्ही देशांचे मच्छिमार अनेकदा अनावधानाने घुसखोरी करतात. त्या घटनांमध्ये दोन्ही देश परस्परांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना अटक करतात. त्यानंतर दोन्ही देशांच्या मच्छिमारांना अनेक महिने तुरूंगात घालवावे लागतात. भारत आणि पाकिस्तानने सदिच्छा पाऊल उचलल्यानंतर बऱ्याचदा त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)