16 वर्षांखालिल निमंत्रीत क्रिकेट स्पर्धा: क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 6 गडी राखुन विजय

पुणे: जय पाटील, सुयश देसाई, अविश्‍कार काशीद आणि अदित्य जाधव यांच्या फलंदाजीच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने सातारा जिल्हा क्रीडासंघाचा सहा गडी राखुन पराभव करताना 16 वर्षांखालील निमंत्रीतांच्या 2 दिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सातार जिल्हा संघाने आपल्या पहिल्या डावात 45.3 षटकांत सर्वबाद 155 धावा केल्या. तर, प्रत्युत्तरात फलंदाजी करताना क्‍लब ऑफ माहाराष्ट्रच्या संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 162 धावांची मजल मारत साताऱ्याच्या संघावर 7 धावांची आघाडी घेतली. यावेळी आपल्या दुसऱ्या डावात साताऱ्याच्या संघाला केवळ 93 धावाच करता आल्या त्यामुळे क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघासमोर 87 धावांचे माफक लक्ष्य होते. त्यांनी हे लक्ष्य 19.3 षटकांत केवळ 4 गडी गमावत पूर्ण करत विजय मिळवला.

-Ads-

प्रथम फलंदाजी करणाऱ्या साताराच्या संघाच्या नमन मेहता (44) आणि जयेश पोळ (56) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 155 धावांपर्यंत मजल मारली. मात्र त्यांच्या संघाच्या इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या सुयश देसाईने 28 धावा देत 2 गडी बाद केले तर सहिल कडने 32 धावांत 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.

156 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाची सुरुवात खराब झाली. मात्र नंतर जय पाटील 27, अविश्‍कार काशीद 37 आणि अदित्य जाधव 44 यांच्या फलंदाजीच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 162 धावांची मजल मारत सातारा संघावर 7 धावांची आघाडी मिळवली.

यावेळी दुसऱ्या डावात साताऱ्याच्या संघातील जयेश पोळ 46 आणि अनिश शिरसट नाबाद 17 यांच्या फलंदाजीच्या जोरावर सातार संघाला 93 धावांची मजल मारता आली, या दोन फलंदाजांव्यतिरीक्त त्यांच्या संघातील इतर फलंदाज केवळ हजेरीवीरच ठरले. कारण त्यांच्या 4 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाकडून सुयश देसाईने 26 धावा देत साताऱ्याच्या 5 फलंदाजांना बाद केले. 87 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रची सुरुवात्‌6ा खराब झाली त्यांचे सुरुवातीचे चार फलंदाज हजेरी लाऊन परतल्यानंतर जय पाटील नाबाद 15 आणि सुयश देसाई नाबाद 40 यांनी आणखीन बळी न पडू देता संघाला विजय मिलवून दीला. यावेळी साताराच्या कौशल भाडगवेने 23 धावा देत 2 गडी बाद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)