16 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

नीरा- नीरा (ता. पुरंदर) येथे गणेशोत्साच्या पार्श्वभूमीवर नीरा पोलिसांकडून 16 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. उत्सव काळात अपघातांचे प्रमाण नेहमी वाढते ते कमी करण्यासाठी अशा प्रकारची करवाई दररोज करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नीरा परिसरात बेदरकपणे वाहन चालविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर लहान मुलांना वाहने देवू नका असे आवाहन करूनही अनेक पालक मुलांना दुचाकी चालविण्यास देत आहेत. गणेशोत्सवात खबरदारीचा उपाय म्हणून नीरा पोलिसांनी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने स्वतः या कारवाईत सहभागी झाले होते.
ट्रिपलसीट, वेगात वाहन चालवणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना परवान्याचे वाहन चालवणे, नंबर प्लेट नसणाऱ्या 16 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या करवाईत फौजदार विजय होले, जमादार बनकर, धर्मवीर खांडे, होमगार्ड व पोलीस मित्र सहभागी होते.

  • गणेशोत्सवासाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. बेशिस्त वाहन चालक ही उत्सव काळातील मोठी समस्या असते. मात्र, यापुढे अशा वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई मध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपून घेतला जाणार नाही. उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस सज्ज झालेत. लोकांनीही पोलिसांना सहकार्य करावे.
    अंकुश माने : पोलीस उपनिरीक्षक जेजुरी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)