16 गावे, 142 वाड्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र

अजून महिनाभर पाणीटंचाई तीव्र होणार

पुणे – जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याच्या टॅंकरची संख्याही वाढलेली आहे. वाढत्या उन्हाच्या तिव्रतेमुळे जिल्ह्यातील 16 गावे आणि 142 वाड्या वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. पावसाळा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे. टॅंकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत असूण गरजेनुसार आणखी टॅंकर सुरू करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी टंचाईच्या झळा जाणवल्या. यामुळे टॅंकरच्या मागणी कमी होती. पुणे जिल्ह्यात सर्वात प्रथम पुरंदर तालुक्‍यात टंचाईच्या झळा वाढल्या होत्या. त्यापाठोपाठ भोर आणि आंबेगाव तालुक्‍यातील पाणीटंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील सुमारे 12 हजार 986 लोकसंख्येची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. यात पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी गाव आणि सात वाड्या, वस्त्या, दिवे गावठाण आणि पवारवाडी, काळेवाडी येथे टंचाई वाढली आहे.

आंबेगाव तालुक्‍यातील पारगावतर्फे खेड गावठाण व पाच वस्त्या, माळीण गावठाण, तर भोर तालुक्‍यातील भुतोंडे गावठाण, खुलशी धनगरवस्ती, म्हसर बु. हुंबेवस्ती, डेहन गावठाण आणि जळकेवाडी, शिरवली हिमा या गावांना आणि वाड्या वस्त्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.
सध्या भोर तालुक्‍यातील 4 गावे आणि तीन वाड्यांना तीन टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुरंदर तालुक्‍यातील 1 गावात आणि 9 वाड्यांवर एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

बारामती तालुक्‍यात एकूण 3 टॅंकरद्वारे दोन गावे आणि 17 वाड्यांना पाणी पुरविले जात आहे. खेड तालुक्‍यात 1 गाव आणि 34 वाड्यांवर तीन टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. दौंड तालुक्‍यात 1 गावाला आणि 4 वाड्यांना 1 टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. तर जुन्नर तालुक्‍यात तीन टॅंकरद्वारे 4 गावे आणि 58 वाड्यांना टॅंकरने पाणी पुरविले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)