16 कोटी रुपयांचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प

ऐंशी टन कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये करण्यात येणार

सातारा – शहराचा रोजचा ऐंशी टन कचरा सोनगावच्या माळावर आशास्त्रीय पध्दतीने जाळला जातो. नगरोत्थान योजनेअंर्तगत तब्बल 16 कोटी रुपयांचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प कचरा डेपोवर उभा रहात असून येत्या डिसेंबरपर्यंत तो पूर्ण होणार आहे. यामध्ये कचरा विलगीकरण सयंत्र, व प्रत्यक्ष प्रक्रिया, त्यासाठी बायो रोटावेटर बसवले जात आहेत. त्यामुळे रोजच्या ऐंशी टन कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये करण्यात येणार आहे. या खताची विक्री करून पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

घन कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचे वर्गवारी झाली पाहिजे. प्रत्येक घर, उद्योग, संस्था (शाळा, महविद्यालय, देऊळ, तीर्थक्षेत्र, उपहारगृहे, इत्यादी) या प्रत्येकाने जैविक कचऱ्याची विल्हेवाट आपापली लावली पाहिजे व इतर कचऱ्यातच्या वर्गीकरणाची जवाबदरीही घेतली पाहिजे.शालेय संस्था आणि संघटनांच्या मदतीने घन घन कचऱ्याच्या वर्गीकरणाबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी छोटो-छोटे उपक्रम राबवले जावेत. कचऱ्यामधला फरक सांगणारी पत्रके वाटली जावीत. जैविक कचरा सोडून इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्य रित्या विल्हेवाटीसाठी गोळा केला जावा.

विकेंद्रित घन कचरा व्यवस्थापन
जैविक कचरा वगळता इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्यरित्या विल्हेवाटीसाठी खासगी कंपनीकडून गोळा केला जाईल. संपूर्ण शहराचा किंवा गावाचा घनकचरा एकत्र गोळा करण्यापेक्षा त्याची अनेक छोट्या-छोट्या केंद्रांवर विल्हेवाट लावणं अधिक उपयुक्त ठरेल. एखाद्या वॉर्डमध्ये जमा होणारा अजैविक कचरा शहराच्या बाहेर टाकण्यापेक्षा त्याची त्याच वॉर्डमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून विल्हेवाट लावली जावी. जैविक कचरा त्याच वॉर्डमधल्या एखाद्या सार्वजनिक बागेमध्ये त्याचे कंपोस्ट करून वापरता येईल. त्यातून तयार झालेले खत विकताही येईल. वॉर्डमधली भाजी मंडई, उपहारगृहे, इत्यादींचा जैविक कचरा खासगी कंत्राटाद्वारे उपयोगात आणण्यात येईल. यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच काही हानिकारक कचरा गोळा करण्याची वेगळी सोय केली जाईल. या सर्वांवर लक्ष, स्थानिक कचरा व्यवस्थापन विभागाची शाखा ठेवेल. ज्या भाजी मंडया, उपहारगृहे, हॉटेल्स, कारखाने कचरा नियोजन कंपनीकडे नियमित कचरा देत असतील, त्यांना स्वच्छता करामध्ये सूट. हे सर्व काम खासगी कंपन्यांच्या मदतीने केले जाईल.

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग
हा विभाग विकेंद्री स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग असेल. या विभागामध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ आणि अभियंता कार्यभार चालवतील. कचरा व्यवस्थापनामध्ये प्रायोगिक, अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष शास्त्रज्ञ आणि अभियंता यांची मदत घेतली जाईल. जैविक कचर्याकचे कंपोस्ट करून खत विकण्यात येईल. शहरांमधल्या सर्व भाजीमंडया, धान्य बाजार, उपहारगृहे व कचरा व्यवस्थापन करणारी खाजगी कंपनी एकत्रितरित्या फायदेशीर कार्यक्रम राबवतील. यातून अनेक कचरा नियोजनाच्या नवीन पद्धती उदयास येतील.

प्रदुषकांना दंड
शहर महापालिकेची कचरा नियोजनासंबंधीची कडक नियमावली असेल. पर्यावरण प्रदूषण करणाऱ्या किंवा धोकादायक कचऱ्यासाठी कारणीभूत असलेल्या संस्थाना (औद्योगिक, व्यवसायिक) दंड आकारण्यात येईल.

नव्या पद्धतीचे कचरा डेपो
कितीही प्रक्रिया केल्या तरी काही प्रमाणात, काहीच प्रक्रिया करु न शकता येणारा कचरा हा उरतोच. त्या कचऱ्याची विल्हेवाट शक्‍यतो शास्त्रीय पद्धतीने जाळून करण्यात येईल. कचरा जाळणे शक्‍य नसेल तेव्हाच तो कचराडेपोमध्ये पुरला जाईल. पण सध्याच्या अशास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या कचरा डेपोंच्या ऐवजी नवे, शास्त्रीय पद्धतीचे कचरा डेपो बांधायला हवेत, ज्यामुळे आजूबाजूचा परिसरावर होणारा विपरीत परिणाम होणार नाही. मात्र कचरा डेपो हा शेवटचा पर्याय असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)