151 तालुक्‍यात दुष्काळ घोषित 

112 तालुक्‍यात परिस्थिती गंभीर 

मुंबई: यंदा अपेक्षापेक्षाही अपुरे पाऊसमान लक्षात घेऊन राज्य सरकारने बुधवारी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील 45 तालुक्‍यांसह एकूण 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्‍यांत दुष्काळ जाहिर केला आहे. यामध्ये 112 तालुक्‍यांमध्ये गंभीर तर 39 तालुक्‍यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील 24 तर कोकणातील 3 तालुक्‍यांचा समावेश आहे. या तालुक्‍यांना आजपासून दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना लागू झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या अनेक भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने गेल्या आठवड्यात 180 तालुक्‍यांमध्ये दुष्कावसदृश परिस्थिती जाहीर केली होती. दुष्काळसदृश या शब्दावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका करीत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तर 31 ऑक्‍टोबर रोजी दुष्काळाच्या संदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला.

तालुक्‍यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र, पिकांची स्थिती या घटकांचा विचार करून सरकारने 151 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. आता केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. एनडीआरएफच्या माध्यमातून केंद्र सरकार दुष्काळ निवारणाच्या योजनांना निधी देते. केंद्राची मदत मिळेपर्यंत दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्‍यांना राज्य सरकारच्या स्थायी आदेशानुसार मदत मिळणार आहे. राज्याच्या मदतीत शेतीपिकाच्या नुकसानीपोटी मदत, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स, जनावरांना चारा, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)