खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत पाचवर्षात 15 हजार मृत्यू

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्‍त केली चिंता

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांमध्ये देशभरात महामार्गांवरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात तब्बल 14,926 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्‍त केली आहे. दहशतवादी हल्ले किंवा सीमेवरील शहिद झालेल्या जवानांपेक्षाही ही आकडेवारी जास्त असावी, असा अंदाज न्या. मदन बी.लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने व्यक्‍त केला.
न्या.दीपक गुप्ता आणि न्या. हेमंत गुप्ता यांचाही सहभाग असलेल्या पिठाने या संदर्भात प्रशासनाला जबाबदार धरले.

-Ads-

सन 2013 ते 2017 या कालावधीमध्ये खड्डे असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती प्रशासनाकडून केली न गेल्यामुळेच इतक्‍या मोठ्या संख्येने नागरिक ठार झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ठार झालेल्या नागरिकांना भरपाई मिळायला हवी, असे सांगून रस्ते सुरक्षेसंदर्भात माजी न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीचा अहवालही न्यायालयाने केंद्र सरकारकडून मागवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)