दक्षिण काश्‍मीरमध्ये देशीविदेशी 150 दहशतवादी सक्रिय : सेना

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) : दक्षिण काश्‍मीरमध्ये देशीविदेशी 150 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती लष्कराच्या व्हिक्‍टर दलाचे जीओसी मेजर जनरल जॉन्सन पी मॅथ्यू यांनी दिली आहे. दहशतवादाविरुद्धची मोहीम आता आणखी तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आरमपोरा त्राल येथे सहा दहशतवादी मारले मारले गेल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. अन्सार-उल-गजवा-ए-हिंदचे सहा दहशतवादी मारले गेल्यानंतरही दक्षिण काश्‍मीरमध्ये 150 दहशतवादी सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्‍मीरमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असली तरी संवेदनशील असल्याचे आणि स्थानिक युवक दहशतवादी बनण्यामागे कट्टर धर्मांध मानसिकता हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)