150 कोटींचा शास्ती कर माफ ?

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या शास्तीमाफीमुळे शहरवासियांचे 150 कोटी माफ होणार असल्याचा दावा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे. तर केवळ बिल्डर लॉबीला समोर ठेवूनच शास्ती कर माफीचे टप्पे जाहीर केले असून, हा देखील सत्ताधारी भाजपचा फुसका बार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

महापालिकेने एक नोव्हेंबरपासून शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरू केली आहे. सहाशे चौरस फूट आकाराच्या 30 हजार निवासी बांधकामांची 80 कोटी, तर 601 ते 1 हजार चौरस फूट आकाराच्या पुढील 18 हजार मालमत्तांचा 74 कोटी असा एकूण 150 कोटी शास्तीकर माफ होणार आहे. नागरिकांनी आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर भरून शास्तीकर माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत एकनाथ पवार म्हणाले की, भाजपने शहरवासीयांना शास्तीकर माफीचा शब्द दिला होता. तो शब्द पाळला असून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल केले आहेत. नागरिकांना शास्तीकर सवलतीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

शास्तीकर माफीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांन स्वत:च्या सोयीनुसार निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारची शास्तीमाफीची घोषणा केवळ आश्‍वासन ठरले आहे. सर्वसामन्य नागरिकांना या निर्णयाचा कोणताही फायदा होणार नाही .
– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)