…आणि यमुनेत बुडणारे १५ जण बचावले 

नवी दिल्ली: बचावकार्याची मोहीम हाती घेऊन यमुनेत बुडणाऱ्या १५ लोकांना उत्तर दिल्लीच्या बुरारी  येथील स्मशानभुमीजवळ वाचवण्यात आले आहे. ज्यामध्ये तीन बालकांचा देखील समावेश होता.
काल पोलिसांना माहिती मिळाली की, यमुनेत १५ लोक वाहत आहेत. त्यावर त्यांनी बचावकार्य हाती घेतले आणि त्यांना वाचवले. यामध्ये ८ पुरुष, चार महिला आणि तीन बालके होती. त्यांना ‘एनडीआरएफ’ आणि दिल्ली अग्निशामक दल या दोघांच्या सहकार्यातून वाचविण्यात आले.
बचावकार्याची मोहीम यशस्वी होण्यासाठी जवळजवळ १ तास गेले. यमुनेच्या पात्राजवळील परिसरात ताकीद देऊन देखील शेतकरी शेतामध्ये फेरफटका मारण्यास जातात त्यामुळे अश्या घटना घडतात, अशी माहिती पोलीसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)