‘संजू’ने प्रदर्शित होण्यापूर्वीच कमविले १५ कोटी !

रणबीर कपूरच्या ‘संजू’ने प्रदर्शनापूर्वीच आगाऊ बुकिंगव्दारे १५ कोटी रुपये कमविले आहेत, असा दावा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केला आहे. ‘संजू’ चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे.

‘संजू’ हा बॉलीवूड स्टार संजय दत्तवरील बायोपिक, प्रदर्शित होण्यापासून पासून फक्त एक दिवस दूर आहे. संजय दत्तची भूमिका अभिनेता रणबीर कपूर करत असल्यामुळे पंडितांनी भविष्यवाणी केली आहे की, बॉक्स ऑफिसवर ‘संजू’ धुमाकूळ घालेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली असून आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘संजू’ उद्या २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री मनिषा कोईराला संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर परेश रावल संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दिया मिर्झा हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

https://youtu.be/1J76wN0TPI4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)