15 उमेदवारांना नोटिसा ; 48 तासांत खर्चाचा मागितला खुलासा

संग्रहित छायाचित्र

उमेदवारांकडून सादर केलेल्या खर्च लेखात अनियमितता ; डॉ. सुजय विखे, आ. संग्राम जगताप यांच्या खर्चात तफावत

नगर: दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील 15 उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून 48 तासांत या उमेदवारांना खुलासा करावा लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पहिली तपासणी 13 एप्रिल रोजी झाली. आतापर्यंत उमेदवारांनी किती खर्च केला, याबाबत उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे हिशोब सादर केला. परंतु बहुतांश उमेदवारांच्या खर्च लेख्यांत अनियमितता आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी या उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत.

यामध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी 1 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान घोषित केलेला खर्च 14 लाख 56 हजार 830 होता, तर प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 18 लाख 54 हजार 357 आहे. म्हणजे 3 लाख 97 हजार 527 रूपयांचा खर्च त्यांनी कमी दाखवला. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी घोषित केलेला खर्च 5 लाख 42 हजार 512 एवढा असून निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 20 लाख 95 हजार 106 रूपये आहे. म्हणजे यात 15 लाख 52 हजार 554 रूपये रकमेची तफावत आहे. या रकमेच्या फरकाबाबतचा तपशीलवार खुलासा करण्याच्या नोटिसा उमेदवारांना बजावण्यात आल्या आहेत.

दत्तात्रय वाघमोडे, फारूख इस्माईल शेख, व ज्ञानदेव सुपेकर या तीन उमेदवारांनी खर्चच सादर केला नाही. याशिवाय सुधाकर आव्हाड, रामनाथ गोल्हार, नामदेव वाकळे, श्रीधर दरेकर, शेख अबीद अहमद, भास्कर पाटोळे या उमेदवारांनी बॅंकेतील खात्यातून खर्च न दाखवता परस्पर खर्च केलेला आहे. त्यामुळे त्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

बळीराम पोपळघट, संजय सावंत, संदीप सकट, साईनाथ घोरपडे यांनी खर्च सादर केलेला असला तरी त्यासोबत आवश्‍यक कागदपत्रे जोडलेले नाहीत, त्यामुळे त्यांनाही नोटिसा काढण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)