15 हजार जणांनी दिली विधि प्रवेश परीक्षा

पुणे – बारावीनंतरच्या पाचवर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीची परीक्षा झाली. एकूण 15 हजार 88 विद्यार्थ्यांनी रविवारी परीक्षा दिली. त्यापैकी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्यापैकी 10 टक्‍के विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रवेश कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील 150 विधि महाविद्यालयांमधील 9 हजार 200 जागांसाठी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यासाठी 16 हजार 581 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 15 हजार 88 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे सक्तीचे करण्यात आले होते. कोल्हापूर, नाशिक येथे काही विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)