पंतप्रधानांनी केली घोषणा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमीत्त देशात स्वच्छता ही सेवा या नव्या स्वच्छता मोहीमेची घोषणा केली आहे. येत्या शनिवार पासून सुरू होंणाऱ्या या मोहीमेत देशातील प्रत्येक नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पंतप्रधानांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की स्वच्छ भारत योजनेत ज्यांनी मनापासून योगदान दिले त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक असून ते या मोहीमेत अधिक योगदान देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवणे हीच महात्मा गांधी यांना खरी आदरांजली ठरेल असे ते म्हणाले.

येत्या 2 ऑक्‍टोबरला महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे आणि त्याच दिवशी स्वच्छ भारत योजनेला चार वर्ष पुर्ण होत आहेत. देशाच्या स्वच्छतेसाठी आणि बापुंचे स्वप्न साकार करण्यासाठीच देशात ही स्वच्छतेची सामुहिक चळवळ राबवली जात आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)