15 वर्षे सत्तेपासून दूर कॉंग्रेसचे मध्य प्रदेशात करो या मरो धोरण 

भोपाळ (मध्य प्रदेश) – 15 वर्षे सत्तेपासून दूर कॉंग्रेसने मध्य प्रदेशात करो या मरो धोरण स्वीकारले आहे. सोमवारी निवडणूक प्रचार थांबल्यानंतरही कॉंग्रेस हाय कमांडने हाय ऍलर्ट जारी करून सर्व विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी स्वस्थ न बसता मतदार संघातील मतदारांच्या संपर्कात राहावे असा आदेशच दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काही गडबड होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्वाने सावध धोरण स्वीकारले आहे. बूथ व्यवस्थापनाबाबतही कार्यकर्त्यांना खास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मध्य प्रदेशातील ज्या विभागात कॉंग्रेसला विजयाची अधिक संधी आहे, त्या भागात मतदानाच्या तीन दिवस अगोदर भाजपा अधिक सक्रिय होणार असल्याची माहिती मिळाल्याने पक्षनेतृत्वापुढील चिंता वाढली आहे. परिणामी मतदानाच्या दिवसाच्या सकाळपर्यंत तयारीत कोणतीही ढिलाई चालणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेवटच्या तीन दिवसात भाजपाने मध्य प्रदेशाच्या प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे दिग्गज प्रचारात उतरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)