15 लाख कधी मिळणार? RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर मिळाले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या वेळी नागरिकांना अनेक आश्वासनं दिली. यामधील सर्वात मोठं आश्वासन म्हणजे नागरिकांच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. पण आता मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरीही १५ लाख रुपये मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनाबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात येत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिले आहे.

मोहन कुमार शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआयअंतर्गत १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्यास नेमकी केव्हापासून सुरूवात होणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

-Ads-

दरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने याबाबत तपशीलवार माहिती दिली नाही अशी तक्रारही शर्मा यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख (सीआयसी) आरके माथुर यांना केली होती. त्यावर, ‘ही माहिती आरटीआय कायद्याच्या सेक्शन २(एफ) अंतर्गत येत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय माहिती आयोगाला मिळाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले तमाशात नाटकात सिनेमात संरक्षित अनेक सवाल जबाबाब असतात ती प्रत्यक्षात यावीत अथवा ह्यातील भूमिका करणाऱ्या हिरोंची मानसिक वैचारिक अथवा प्रत्यक्ष वागणूक तशी असल्याची पाहावयास मिळते का ? जादूगार नव्या नव्या जादू सादर करतो त्यात पैशाचा पाऊस पाडण्याची सुद्धा जादू असते मग हा जादूगार पैशासाठी दारोदार का हिंडतो हा प्रश्न आपण स्वताहाला विचारतो का ? घरातील संडासाची महत्व जेव्हडे आहे त्याच प्रमाणे संसद भावनांचे परिवर्तन संडासभावनात झाल्यानेच वरील प्रष्णांचे उत्तर टाळण्यात आले असावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)