15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मानधन 5 कोटी

“पद्‌मावत’च्या प्रचंड यशानंतर अभिनेता रणवीर सिंहचे स्टारडम एकदम वाढले आहे. त्याने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिलजीला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. खलनायकी भूमिका असली तरी त्याच्या रोलमुळे त्याला मिळालेली प्रसिद्धी खूपच जास्त होती. आता हाच रणवीर ही पॉप्युलॅरिटी एन्कॅश करून घेण्यासाठी “आयपीएल’च्या मैदानात उतरणार आहे.

“आयपीएल’च्या सीझन 11 च्या 7 एप्रिल रोजी होणाऱ्या उद्‌घाटनाच्या सत्रामध्ये रणवीर सिंह परफॉर्मन्स सादर करणार आहे. त्याने या 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल 5 कोटी रुपयांचे मानधन मागितले आहे. रणवीर सध्या देशात सर्वाधिक फॅन फॉलोवर्स असलेला स्टार ऍक्‍टर आहे. त्यामुळे त्याच्या मानधनाबाबत कोणतीही घासाघीस करण्यात आली नाही, असेही समजते आहे.

उद्‌घाटनाच्या समारंभामध्ये परफॉर्मन्स देणारा रणवीर सिंह हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. “पद्‌मावत’च्या यशानंतर रणवीर सध्या “गली बॉय’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्याबरोबर असणार आहे चुलबुली गर्ल आलिया भट आणि हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. तोपर्यंत रणवीरने एका सिनेमाइतके मानधन केवळ 15 मिनिटांच्या परफॉर्मन्सद्वारे वसूल केलेले असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)