15 दिवसात केवळ 9 तास चालले संसदेचे कामकाज – रु.120 कोटींची बरबादी

नवी दिल्ली – गेल्या 15 दिवसांत संसदेचे केवळ 9 तासांचेच कामकाज होऊ शकले आहे. अंदाज पत्रकी अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू झाल्यापासून लोकसभा आणि राज्यसभेतही गोंधळामुळे कामकाज होऊ शकलेले नाही. केवळ 9 तासांचे कामकाज वगळता बाकी सारा वेळ वाया गेलेला आहे. यात नुकसान झाले आहे, ते जनतेचेच. कारण संसदेचे कामकाज जनतेच्या पैशातून चालते. संसतेचे कामकाज होवो अथवा न होवो त्याचा खासदारांवर परिणाम होत नाही. संसदेचे काम झाले किंवा नाही झाले, तरी खासदारांना त्यांचा पूर्ण पगार मिळणारच आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार संसदेचे कामकाज फक्त मिनिट तरी चालले, तरी त्यासाठी सुमारे 2.50 लाख रुपये खर्च येतो. दोन्ही सदनांचे कामकाज सरासरी 6 तास चालले, तरी दिवसाला 9 कोटी रुपये खर्च येतो. जर सदनांचे कामकज दररोज 6 तास चालले असते, तर एकूण 90 तासांचे कामकाज झाले असते. म्हणजे या वेळी कामकाजचे 81 तास वाया गेले. आणि त्यासाठी जनतेचे 120 कोटी रुपये बरबाद झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकार

प्रत्येक खासदारावर दरमहा सरासरी 3 लाखापेक्षा अधिकच रुपये खर्च करते. या 15 दिवसात विधानसभा फक्त 5 तास 10 मिनिटे चालली. 27 वेळा कामकाज स्थगित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)