15 ऑगस्ट पासून भाजपचा सामाजिक न्याय पंधरवडा

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने येत्या 15 ऑगस्टपासून 30 ऑगस्ट पर्यंत संपुर्ण देशभर सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करण्याची घोषणा केली आहे. तसेच पुढील वर्षी पासून 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत सामाजिक न्याय सप्ताह साजरा करण्याची घोषणाही पक्षाने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याची घोषणा केली होती. दलितांवरील अत्याचारांच्या विरोधातील कायद्याचे मूळ स्वरूप कायम ठेवण्याचे विधेयक तसेच ओबीसी आयोगाला वैधानिक आधिकार देणारे विधेयक मंजुर करण्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने ही घोषणा केली आहे. ही महत्वाची विधेयके मंजुर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारा प्रस्तावही भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)