15 ऑगस्टला जमतो “आठवणींचा कट्टा’

दोन दिवस आधिपासून लगबग : माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी उलगडू लागतात

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 14 – फुगे, रांगोळ्या आणि फुलांनी सजलेली शाळा… झेंडावंदन होताच तिरंग्याला सॅल्युट करत मोठ्या आवाजात सामुहीक राष्ट्रगीत आणि वंदेमातरम म्हणणे…लेझीम, साहसी खेळ, समुहगीत यासह विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे सादरीकरण… आणि महत्त्वाचे खाऊ वाटप…हा सर्व अनुभव मिळतो तो शाळेमध्ये. त्यामुळे माजी विद्यार्थी या आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी शाळेला भेट देत शाळेचा कट्टा भरवला जातो आणि “माझ्या शाळेतील 15 ऑगस्ट’च्या जुन्या आठवणी उलगडू लागतात.

शाळा सोडल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी किंवा व्यवसायामध्ये कधी गुंतूण जातो हे कळतही नाही. त्यामध्ये अनेक वर्षे उलटून जातात. मात्र, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आल्यावर प्रथमत: शाळेतील जुने दिवस आठवतात आणि त्या दिवशी शाळेच्या दिशेने पावले चालू लागतात. ज्यांना शाळेत जाणे शक्‍य होत नाही ते शाळेतील मित्रांना फोन करून आठवणींना उजाळा देतात. शाळेतील 15 ऑगस्टचा दिवस म्हटल्यावर दोन दिवस आधिपासून लगबग सुरू असते. मैदानाची स्वच्छता करणे, फुगे, फुलांच्या माळा लावणे यासह लेझीम, बासरीवादन, समुहगीत यासह विविध कार्यक्रमांची रंगीततालीम सुरू असते. या लगबगीमध्ये 15 ऑगस्टचा दिवस उजाडतो.

सकाळी साडेसहा वाजताच शाळेमध्ये उपस्थित राहून एका रांगेत बसलेली मुले, व्यसपीठावर बसलेले प्रमुख पाहुण्यांने, मैदानाभोवती उभे असलेले पालकवर्ग अशा प्रसन्न वातावरणात झेंडावंदन होताच हात आपोआप त्या तिरंग्याला सॅल्युट करतात आणि राष्ट्रगीताला सुरुवात होते. हा क्षण अंगावर काटा आणतो. यावेळी शाळेकडून बोलवण्यात आलेले प्रमुख पाहुणे हे सैन्य दलातील किंवा देशासाठी त्यांचे मोठे योगदान आहे अशांना निमंत्रीत केले जाते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन एकताना जीवनात आपणही देशसेवेसाठीच जन्माला आलो आहोत, अशी भावना निर्माण होते. मुळात, ही भावना मनात ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने देशसेवेचे व्रत हाती घेतले तर नक्कीच उद्याचा भारत बदलेला दिसेल.

—————————
दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही मित्रमंडळी शाळेत भेटण्याचे नियोजन करतो. यावर्षीही भेटणार आहोत. शाळेतील झेंडावंदन झाल्यावर शिक्षकांना भेटून त्यांचे आशिर्वाद घेतो. त्यांची एक थाप आम्हाला खूप काही देऊन जाते. यावेळी शाळेतील जुना आठवणींमध्ये रमल्यामुळे ऑफीस आणि कामाचा आलेला ताण काहीच वाटत नाही. शाळेतील कार्यक्रम झाल्यावर मस्तपैकी सर्व मित्रमंडळी नाष्टा करून निरोप घेतो.
– केतन बावळेकर, रामचंद्र राठी विद्यालय, लॉ-कॉलेज रोड
—————————
15 ऑगस्ट हा दिवस आमच्यासाठी मैत्री दिन असतो. त्यादिवशी कधी न भेटणारे मित्र-मैत्रीणी भेटतात. त्यामुळे आवर्जून आम्ही शाळेत जातो. यावेळी सर्व मित्र फॅमिलीसह एकत्र येणार आहोत. त्यामुळे नवीन ओळखी वाढतात. शाळेतील मुलांना पाहिल्यावर रांगेत बसून आम्ही जो खोडसाळपणा करायचो त्या आठवणी जाग्या होतात. शिक्षकांना भेटल्यावर मन भरून येते, त्यांनाही आम्ही भेटल्याचा आनंद होतो. ते कुतुहलाने आमची चौकशी करतात त्यामुळे आमाचा आनंद द्वीगणीत होतो.
– ओम मांजरे, अभिनव विद्यालय, नळस्टॉप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)