उत्पादन शुल्कला 1405 कोटी 31 लाखांचा महसूल

देवीप्रसाद अय्यंगार

उद्दिष्ट पूर्तीच्या उंबरठ्यावर ः परवाने नूतनीकरण प्रक्रिया सुरू  कारवाईचे सत्र जोरात

उद्दिष्ट पूर्तीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेल्या महसूल वसुली बरोबरच कारवाईचे सत्रही जोरात सुरू ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ते या महिन्याच्या एप्रिल महिन्यापर्यंतच्या कालावधीत 1747 गुन्ह्यात 1165 आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्या कडून हातभट्टी, रसायन, देशी, विदेशी मद्य, बिअर, ताडी तसेच परराज्यातील मद्य, मद्यार्क असे सर्व मिळून 2 लाख 73 हजार 786 लिटर इतकी दारू जप्त तसेच 171 वाहनेही जप्त करण्यात आली.

नगर – राज्य उत्पादन शुल्कने वर्ष 2018-19 साठी शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्टे गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून ठरलेल्या उद्दिष्ट्याच्या जवळ पोहोचतांना या विभागाने 1405.21कोटी रुपयांचा महसूल वसूली केली आहे. 1413.87 कोटी रुपयांचे एकूण उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते त्यापैकी 99.39 टक्के उद्दिष्ट गाठण्यात या विभागाला यश आहे. तर 2019 च्या एप्रिल महिन्यात जवळपास 109 .44 लाख रुपयांचा महसूल वसूल झाला आहे.

जिल्ह्यातील देशी विदेशी मद्याच्या उत्पादनांवर आकारला जाणारा हा कर असून यात जिल्ह्यातील एकूण 10 देशी विदेशी मद्य उत्पादकांकडून हा कर वसूल केला जातो. गेल्यावर्षी (2017-18) याच विभागाला 1431 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्यावेळी मद्य निर्मितीत घट दिसून आल्याने यंदा महसुलातही ही घट धरण्यात येवून यंदा 1413.87 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखान्याकडून यंदा सर्वाधिक महसूल मिळाला असून त्याची रक्कम 619कोटी 32लाख रुपये इतकी आहे. तर त्या खालोखाल संजीवनी सह.सा.कारखान्याकडून 276 कोटी 21 लाख, करण बॉटलिंग कंपनी प्रा.लि.श्रीरामपूर यांच्याकडून 237कोटी 65 लाख, व्ही. के. डिस्टीलरीज प्रा. लि. श्रीरामपूर 74 कोटी 90 लाख, पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील सह.सा.कारखाना 68 कोटी 53 लाख, चितळी बॉटलिंग लि. चितळी 35 कोटी,72 लाख ,हिंदुस्तान डिस्टीलरीज प्रा. लि. 25 कोटी 72 लाख असा 1337 कोटी 3 लाख रुपयांचा नहदूल वसूल झाला असून विदेशी मद्य तयार करणाऱ्या ती कंपन्यांकडून टिळकनगर इंडस्ट्रीज टिळकनगर कडून 9 कोटी 34 लाख, आणि हिंदुस्तान डिस्टीलरीज प्रा. लि. कडून 23 लाख 90 हजार रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरीक्त मद्य निर्मिती आणि विक्रेत्यांच्या परवान्या पोटी सुद्धा चांगला महसूल गोळा होतो. नगर जिल्ह्यात असे 806 परवाने असून त्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते या परवान्याच्या नूतनी करणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या नूतनीकरणाची शुल्क आकारणी परिपत्रकाप्रमाणे आणि लोकसंख्येनुसार केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)