140 दहशतवाद्यांचा सहा महिन्यात खात्मा

File photo...

नवी दिल्ली: चालू वर्षात जून ते डिसेंबर या सुमारे सहा महिन्याच्या काळात जम्मू काश्‍मीरात तब्बल 140 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती केंद्र सरकार तर्फे आज गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली. यावेळी काश्‍मीरात झालेल्या अन्य हिंसक घटनांचीहीं माहिती दिली. ते म्हणाले की याच कालावधीत तेथील नागरीकांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्याच्या एकूण 426 घटना घडल्या. त्यात 36 नागरीक जखमी झाले.

काश्‍मीरात दहशतवाद्यांशी लढताना 171 सुरक्षा जवानांना हौतात्म्य आले असेही त्यांनी नमूद केले. दहशतवादी मारले गेल्याच्या तुलनेत हौतात्म्य पत्कराव्या लागलेल्या सुरक्षा जवानांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी म्हणजे सन 2017 या संपुर्ण वर्षात एकूण 167 जवानांना हौताम्य पत्करावे लागले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)