14 वर्षांच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुलगा ताब्यात : उरूळी कांचन दूरक्षेत्रात गुन्हा दाखल

लोणी काळभोर- घरात कोणीही नाही यांचा मोका साधून 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाने 6 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार व अनैसर्गीक कृत्य केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. हा प्रकार रविवार (दि. 17) रोजी दुपारी घडला आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी मुलास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आपली आई व भावासमवेत तर मुलगी आपले आई-वडील आणि लहान भाऊ बहिणीसोबत शेजारी रहातात. दि. 17 मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास मुलीचे वडील आपल्या 5 वर्षे वयाच्या मुलाला आजारी असल्याने रक्‍त देण्यासाठी ससून रूग्णालय पुणे येथे घेवून गेले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास दोन्ही कुटुंबीय घराशेजारी असलेल्या झाडाखाली गप्पा मारत बसले होते. घर सारवायचे असल्याने मुलगी व मुलाची आई दोघी शेण आणण्यासाठी निघाल्या. त्यावेळी मुलाने मुलीच्या आईला मी तुमच्या मुलीला झोपवतो. तिच्याकडे लक्ष ठेवतो, असे सांगितले होते.

दुपारी त्या दोघीजण शेण घेवून घरी आल्या. त्यावेळी लहान मुलगी झोपलेली व पीडित मुलगी तिच्याशेजारी बसली होती. आईला पाहताच ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. शेजारी राहणाऱ्या दादाने केलेला प्रकार तिने आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी उलटी करू लागली. आईने तिला समजावून सांगितले. दवाखान्यात जाऊ म्हणाली. पती घरात नसल्याने ती खूप घाबरली होती. त्यामुळे ही घटना तिने कोणासही सांगितली नाही.

दि. 20 मार्च रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मुलीचे वडील ससून रुग्णालयातून आजारी मुलाला घेवून घरी परतले. त्यावेळी मुलीबरोबर झालेला प्रकार पत्नीने त्यांना सांगितला. हे ऐकून तोही गडबडून गेला. दि. 21 मार्च रोजी सुमारास मुलीचे वडिलांनी ही घटना नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात तक्रार देण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)