आरटीओकडे 14 हजार 185 वाहनांची नोदंणी

25 कोटी 20 लाखांचा महसूल जमा

पुणे – यंदाही पुणेकरांनी दिवाळीचा मुहूर्त साधत वाहन खरेदीला पसंती दर्शविली आहे. या दिवाळीत पुणेकरांनी तब्बल 14 हजार 185 वाहनांची खरेदी केली आहे. या वाहनांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करण्यात आली असून विविध करापोटी या वाहन खरेदीदारांकडून “आरटीओ’ला तब्बल 25 कोटी 20 लाखांची महसूल प्राप्त झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीमध्ये 10 हजार 800 वाहनांची “आरटीओ’कडे नोंदणी झाली होती, तसेच या वाहनधारकांकडून “आरटीओ’ला 17 कोटी 5 लाखांचा महसूल प्रप्ता झाला होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा 3 हजार 385 जादा वाहनांची खरेदी झाली असल्याने महसूलही 8 कोटी 15 लाखांनी वाढला आहे.

दिवाळीमध्ये नागरिक दरवर्षी वाहन खरेदीला पसंती देतात. धनत्रयेदशी, लक्ष्मी पूजन किंवा पाडव्याला नवीन वाहन घरी आणण्याकडे अनेकांचा कल असतो. यंदाही पुणेकरांनी मोठ्या प्रमाणत वाहन खेरदी केली आहे. यंदा पुणेकरांनी 9 हजार 478 दुचाकी, 3 हजार 471 चारचाकी (कार) तर, 1 हजार 235 व्यावसायिक वाहनांची खरेदी केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2017 च्या दिवाळीमध्ये पुणेकरांनी 8 हजार 685 दुचाकी, 1 हजार 145 चारचाकी (कार) तर, 970 व्यावसायिक वाहनांची खरेदी करण्यात आली होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीच्या संख्येत 3 हजार 385 ने वाढ झाली आहे. तसेच गेल्या वर्षी दिवाळीमध्ये नवीन वाहनांच्या करापोटी आरटीओला 17 कोटी 5 लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा या महसुलाच्या रकमेत 8 कोटी 15 लाखांनी वाढ होत एकूण 25 कोटी 20 लाखांचा महसूल आरटीओ प्राप्त झाला आहे.

दिवाळीच्या दिवसांत नवीन वाहन घरी आणायचे यासाठी अनेक नागरिक एक आठवडाभर आधीच वाहनांची खेरदी करतात. त्यानंतर, े”आरटीओ’मध्ये सर्व कागपत्रांची पूर्तता करून या वाहनांची नोंदणी केली जाते. यंदा रविवारच्या सुट्‌टीच्या दिवशीही कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. तसेच सर्वच वाहनांची नोंदणी वेळेत व्हावी, यासाठी 11 जादा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, असे उपप्रदेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)