उत्तर प्रदेशमध्ये पावसाने घेतला 14 जणांचा बळी

 मृतांची संख्या 106 वर
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत विविध भागांतील पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
फारुखाबाद आणि बहराइच येथे प्रत्येकी एक जण ठार झाला तर खेर, रायबरेली, लखनऊ, कानपूर देहट, बाराबंकी, सीतपौर आणि सुलतानपूरमध्ये प्रत्येकी एक जण ठार झाला.
अशा घटनांमध्ये गेल्या आठवड्यात 106 लोकांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. तसेच पावसामुळे 80 पेक्षा जास्त पशूंनी आपले प्राण गमावले. तर 600 घरांचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जनतेला जागरुक करण्यासाठी निर्देश दिले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)