14 काद्यांच्या पिशव्यांची 74 रुपये पट्टी

शेतकऱ्यांवर कांदा पीक नको रे बाबा म्हणण्याची वेळ : पदरमोड करुन विकला कांदा

मंचर: आंबेगाव तालुक्‍यातील शिंगवे येथील शेतकरी सुनिल निवृत्ती वाव्हळ यांनी पुणे येथे 14 कांद्याच्या पिशव्या विक्रीसाठी पाठविल्या होत्या; परंतु बाजारभाव गडगडल्याने 14 पिशव्यांचे त्यांना जेमतेम 74 रुपयांची पट्टी आली. बारदानाचा खर्च आणि आलेली पट्टी याचा ताळमेळ घातला तर 206 रुपये त्यांना पदरचे घालावे लागले. साडे तीन महिने कांदा काढण्यासाठी लागलेला कालावधी, उत्पादनासाठी झालेला 8 हजार 206 रुपयांचा खर्च स्वत:ला करावा लागला. त्यामुळे यापुढे कांदा पीक नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.

206 रुपये पदरमोड
14 पिशव्यांचे बारदानाचा खर्च वजा जाता 206 रुपये त्यांना पदरमोड करावी लागली.कांदा उत्पादनासाठी झालेला एकुण 8 हजार रुपये खर्च आणि बारदानाचा झालेला 206 रुपये खर्च असा एकुण 8 हजार 206 रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या दिड वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला 60 ते 70 रुपये 10 किलोपर्यंत जेमतेम बाजारभाव मिळत आहे. कांदा उत्पादनासाठी तीन ते साडे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी कांद्याचे रोप, मजुरी, औषध फवारणी, खते, कांदा काढणी आणि बाजारपेठेत पाठविणे यासाठी एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. झालेला खर्च वसूल होण्यासाठी किमान 10 ते 15 रुपये किलो बाजारभाव मिळणे अपेक्षित असताना सध्या मिळणारा नाममात्र बाजारभाव पाहता शेतकऱ्यांना कांदा काढणे किंवा वाहतूक करणे नुकसानदायक ठरत आहे.

सुनिल वाव्हळ यांच्या 10 गुंठे क्षेत्रातील कांद्याला 8 ते 10 हजार रुपये खर्च झाला. त्यांनी पुणे येथील व्यापाऱ्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या 9 पिशव्या पाठविल्या. त्यास 10 किलोसाठी 12 रुपये बाजारभावाने एकुण 552 रुपये मिळाले. तसेच 5 पिशव्या गुलटी कांदा पाठविला. त्यास 10 किलोला 10 रुपये बाजारभाव मिळाला. त्याचे 255 रुपये झाले, असे एकुण 14 पिशव्यांना 55 रुपये 45 पैसे हमाली, तोलाई 30 रुपये 5 पैसे, भराई 17 रुपये 50 पैसे, मोटारभाडे 630 रुपये असा एकुण 733 रुपये खर्च झाला.कांद्याचे एकुण 807 रुपये झाले. एकुण झालेल्या खर्चातून वजा करुन 74 रुपयांची पट्‌टी शेतकऱ्याच्या हातात मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)