विभाजनवादी नेते गिलानींना 14 लाख रूपयांचा दंड 

नवी दिल्ली –जम्मू-काश्‍मीरमधील विभाजनवादी नेते सैद अली शाह गिलानी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 14 लाख 40 हजार रूपयांचा दंड ठोठावला. त्याशिवाय, सुमारे 7 लाख रूपये रकमेचे परकी चलन जप्त करण्यात आले. परकी चलन व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग करून अवैधरित्या 10 हजार अमेरिकी डॉलर्स बाळगल्याशी संबंधित 17 वर्षे जुन्या प्रकरणात ती कारवाई करण्यात आली.

गिलानी यांच्या श्रीनगरमधील घरावर 2002 मध्ये प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. त्या छाप्यावेळी परकी चलन बाळगल्याचे उघड झाले. प्राप्तिकर विभागाच्या अहवालाची दखल घेऊन ईडीने संबंधित प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. गिलानी हे हुर्रियत कॉन्फरन्स या विभाजनवादी संघटनेच्या जहाल गटाचे नेते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)