14 लाखाच्या मालासह ट्रक चालक फरार

file photo

ट्रान्सपोर्ट मालकाचाही समावेश
सातारा – साताऱ्यातील कंपनीतून औरंगाबाद येथे घेऊन निघालेल्या मालासह फरार झालेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

सुरज साठे रा. औरंगाबाद, कुरेशी (पुर्ण नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी मुथा कंपनीचे विश्‍वास नारायण दळवी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. केसरकर पेठ,सातारा येथील कुरेशी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मुथा फाऊंडेशन प्रा.लि. या कंपनीतून औरंगाबाद येथे कास्टींग ब्लॉक पोहचवायचे होते. त्यासाठी कुरेशी यांनी मुथा कंपनीला संपर्क साधत माल पोहचवण्याची हमी दिली होती. त्यानुसार कुरेशी यांनी सुरज साठे रा. औरंगाबाद याला त्याच्या गाडीसह मुथा कंनीत पाठवले होते. त्यावेळी साठे याने त्याच्याकडे असलेल्या एम एच 20 सीटी 5755 ट्रकमध्ये 14 लाख तीस हजाराचा माल भरला. व तो औरंगाबाद येथील कंपनीत जाण्यासाठी निघाला. मात्र तीन दिवस झाले तरी, सुरज हा औरंगाबद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीत पोहचला नाही.

त्यामुळे मुथा कंपनीने कुरेशी यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी गाडीचा टायर फुटल्याने तो पोहचला नाही. असे कळवले. त्यावेळी कंपनीने साठे याला फोन केला मात्र लागला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सुरज साठे रा.औरंगाबाद,अंजिक्‍य ट्रान्सपोर्टचा मालक कुरेशी याच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात 14 लाख तीस हजाराच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पो.उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)