14 लाखांचे सोने असलेली बॅग लांबविली

शिर्डी येथील लग्नसमारंभातील घटना, अज्ञात चोरांविरोधात गुन्हा

शिर्डी: विवाह सोहळ्यातून सोन्याचे दागिने चोरी करण्याचे प्रकार सर्रासपणे शिर्डी शहरात सुरु असून, रविवारी (दि.30) शहरातील एका नामांकित हॉटेलमधून 43.9 तोळे सोन्याने भरलेली बॅग साधारण 14 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची बॅग चोरी गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी शिर्डी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये मालेगाव येथील मिलिंद रमेशचंद्र पटणी यांचा मुलगा चिराग पटनीचा नाशिक येथील शाह परिवारातील वधूशी विवाहसोहळा होता. या विवाहात वधूला घालण्यासाठी वर पक्षाकडून पटणी परीवाराने आणलेले सोन्याचे दागीने एका बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान दुपारी 2 च्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी पाळत ठेवून, सोन्याचे दागीने भरलेली बॅगच लंपास केली. सदर बॅगमध्ये चव्वेचाळीस तोळे सोने असल्याचे पटणी यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना मिळताच, शिर्डी पोलीसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. दोन अज्ञात चोरांनी बॅगवर पाळत ठेवली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. यामधील एकाने विवाह सोहळ्याच्या ठिकाणी स्टेजजवळ नातेवाईक बोलण्यात गुंतलेले पाहून सोप्यावर ठेवलेली बॅग घेवून फरार झाल्याचे कॅमेरात दिसत आहे. शिर्डी पोलिसांत तक्रारदार सचिन रमेशचंद्र पटणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिथून घुगे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)