14 राज्यांचा पाठिंबा असल्याचा शरद यादव यांचा दावा

नवी दिल्ली – संयुक्‍त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी पक्षामध्ये फूट पाडण्याची पुरेपूर तयारी केली आहे. संयुक्‍त जनता दलातील 14 प्रादेशिक समित्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा शरद यादव यांनी केला आहे. नितीश कुमार हे पक्षाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याविरोधात या प्रादेशिक समित्यांचे आव्हान उभे करण्याची तयारी यादव यांनी चालवली आहे.

शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये राज्यसभेचे दोन खासदार आणि राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांसह 14 राज्यांमधील प्रादेशिक कार्यकारिणीच्या अध्यक्षांनी यादव यांना पाठिंबा असल्याचे पत्र पाठवले आहे. शरद यादव यांचे निकटचे सहकारी अरुण श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी नुकतेच शरद यादव यांना पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटवले आहे.

“जेडियु’ची ओळख केवळ बिहारपुरती आहे, या नितीश कुमार यांच्या दाव्याला विरोध करण्यासाठी अन्य प्रादेशिक पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा शरद यादव यांना दिला आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. शरद यादव हे नितीश कुमार यांच्या आगोदरपासून समता पक्षामध्ये विलीनीकरण होण्यापूर्वीपासून पक्षाचे अध्यक्ष होते. जर संयुक्‍त जनता दलाला बिहारबाहेर अस्तित्व नाही, असे नितीश कुमारांना वाटत असेल, तर त्यांनीच नवीन पक्ष स्थापन करावा. आम्ही पक्ष सोडणार नाही, असेही श्रीवास्तव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)