दक्षिण मुंबईतून 135 किलो सोने जप्त

मुंबई – दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई डीआरआयच्या पथकाने केली आहे. सोने तस्करांवर करण्यात आलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आले आहे. डोंगरी भागात सोने तस्करी येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रसंगी वाहनांची तपासणी केली स्कूटरच्या आतमध्ये 2 गोलाकार डिस्क स्वरुपात 30 किलो सोने आढळले. तर दुसरा वाहनामध्ये 45 किलो सोन्याच्या 3 गोलाकार डिस्क सापडले. या कारवाईत एकूण 135 किलो सोन्यासह 2 दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी आतापर्यंत 200 किलो सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. डीआरआयच्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. आरोपींनी आतापर्यंत 200 किलो सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)