छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) या ग्रंथाचे प्रकाशन

पुणे – श्रीमंत कोकाटे लिखित छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बुधवारी (दि. 21) सकाळी 9.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, पी. ए. इनामदार, प्रविण गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीचे सचिव राहूल पोकळे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तुनिष्ठ इतिहासावर प्रकाश टाकणारे रंगीत चित्रमय आर्ट पेपरवर छपाई करण्यात आलेले शिवचरित्र असून, शिवाजी महाराजांचा सकारात्मक इतिहास यामध्ये आहे. शिवाजीराजांचे बालपण, शिक्षण, विवाह, त्यांचा लढा याबरोबरच शिवरायांची समता, कृषीधोरण, महिला विषयक, भाषाविषयक, धर्मविषयक धोरण याबाबत अत्यंत साध्या सोप्या परंतू संदर्भावर आधारित्र चरित्राची मांडणी करण्यात आलेली आहे. सर्व चित्र रंगीत असून शिवपूर्वकाळापासून शिवरायांच्या मृत्युपर्यंतचे प्रसंग रेखाटण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)