बांगलादेशातील मतदानादरम्यान हिंसाचारात 13 ठार

ढाका: बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आज झालेल्या मतदानात हिंसाचार होऊन किमान 13 जण ठार झाले. या हिंसाचारामागे सत्तारूढ आवामी लीगच्या प्रमुख शेख हसिना या असल्याचा आरोप होतो आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 300 जागांपैकी 299 जागांसाठी 1,848 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 40 हजार मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यापैकी एका ठिकाणी उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान रद्द करण्यात आले. दिवसभरात शेकडो उमेदवारांकडून हिंसाचाराच्या तक्रारी दाखल झाल्या. देशभरात 8 जिल्ह्यांमधून हिंसाचारामध्ये 12 कार्यकर्ते आणि एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. यामध्ये 5 जण आवामी लीगचे तर अन्य बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आहेत. डझनवारी अन्य नागरिक जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“बीएनपी’च्या किमान 10 उमेदवारांनी मतदानावर बहिष्कार घातला. आपल्या पोलिंग एजंटना मतदान केंद्राबाहेर घालवून देण्याचा आले आणि मतदानकेंद्रे आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप या उमेदवारांनी केला.
नॅशनल युनिटी फ्रंटचे ज्येष्ठ नेते कमल होसैन यांनी मात्र सर्वसाधारण वातावरण टीका होत असलेल्याइतकी वाईट नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जतिया ओकिया फ्रंट किंवा एनयूएफ ही “बीएनपी’, गानो फोरम, जतिया समजतांत्रिक दल, नागोरिक ओइक्‍य आणि कृषक श्रमिक जनता लीग या चार पक्षांची आघाडी आहे.

देशभर हिंसाचार रोखण्यासाठी 6 लाख सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. हिंसा किंवा चिथावणीचे मेसेज पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवाही खंडीत ठेवण्यात आली आहे. काही वृत्तवाहिन्यांचे प्रसारणही बंद ठेवण्यात आले आहे.
आज दिवसभर झालेल्या मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रियाही सज्ज असल्याचे निवडणूक आयोगाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. सोमवारी सकाळी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)