राज्य मागासवर्गीय आयोगावर 13 कोटींचा खर्च 

बार्टी संस्थेकडून रक्‍कम उपलब्ध झाल्याचे माहिती अधिकारातून उघड 

सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांवरही 57 लाखांचा खर्च 

मुंबई – राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर तब्बल 13 कोटी 16 लाख रुपये खर्च केले आहेत. इतकेच नव्हे तर या आयोगासोबत ज्या संस्थांनी सर्वेक्षणाची भूमिका बजावली त्यांच्यावरही तब्बल 57 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) या संस्थेकडून घेण्यात आली असल्याची माहिती सरकारकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 3 नोव्हेंबर 2017 रोजी एक परिपत्रक काढून राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष गणपतराव गायकवाड यांचे प्रतिमाह 1 लाख 60 हजार इतके मानधन निश्‍चित केले होते. सरकारने आयोगावर आत्तापर्यंत तब्बल 13 कोटी 16 लाख 64 हजार 136 रूपये खर्च केले असून त्याची रक्कम बार्टीकडून देण्यात आली आहे.

यात सुरूवातीला 14 मार्च 2014 रोजी 10 कोटी, त्यानंतर 8 मार्च 2017 रोजी 1 कोटी 80 लाख आणि 23 मार्च 2018 रोजी 1 कोटी रूपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहितीही बार्टीने दिली आहे. यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर माहिती गोळा करण्यासाठी व त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी पाच संस्थांना प्रत्येकी 10 लाख रूपये खर्चास मंजूरी देण्यात आली होती.

त्यापैकी औरंगाबाद येथील छत्रपती शिवाजी प्रबाधेन संस्थेला 11 लाख, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी संस्था, मुंबई, 11.80,लाख शारदा कन्सलटन्सी सव्रहीसेस नागपूर-11.80लाख, गुरूकृपा विकास संस्था, कल्याण-10.00लाख, गोखले इस्क्‍टीट्यूट ऑफ पोलिटीक्‍स ऍण्ड इकॉनॉमिक्‍स, पुणे-11.80 लाख असे एकुण 57.20 लाख रूपये इतका खर्च या संस्थांवर करण्यात आला आहे. बार्टीकडून मिळालेल्या एकुण 13 कोटी 16 लाख 64 हजार 136 रूपयांच्या अनुदानावर 36 लाख 64 हजार 936 रूपयांचे व्याजही मिळाले आहे, अशी माहिती बार्टीने माहिती आधिकार कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांना दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)