13 ऑगस्ट रोजी रोजगार भरतीचे आयोजन 

तळेगाव दाभाडे : "पीसीईटी'च्या तळेगावमधील "एनएमआयईटी' महाविद्यालयात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सातारा- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रोजगार भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 135 रिक्‍त जागांसाठी ही भरती होणार आहे. सातारा एमआयडीसी कोरेगाव या कंपनीमध्ये आयटीआय (फिटर-वेल्डर-इलेक्‍ट्रिशियन-प्लंबर) पदविका (इलेक्‍ट्रिकल) व दोन वर्ष अनुभव अकौंट असिस्टंट बी. कॉम व संगणक व दोन वर्ष अनुभव या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी संपर्क करावा.
युरेका फोर्ब्स सातारा या कंपनीमध्ये सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह या पदासाठी एसएससी एचएससी पदवीधर पदव्युत्तर पदवी या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठीच्या रोजगार भरती मध्ये समावेश आहे. या रोजगार भरतीमध्ये उमेदवारांना प्रवेश मोफत आहे. उमेदवारांनी येताना शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे बायोडाटा व फोटो सोबत आणावेत. इच्छुकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)