हुशश… इंग्रजीचे टेंन्शन दूर

पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधुक : बारावी परीक्षेला सुरूवात


राज्यात 75 कॉपी करताना आढळून


विद्यार्थी अर्धातास अगोदरच परीक्षा केंद्रात


15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी


औरंगाबाद विभागात सर्वांधिक 26 विद्यार्थ्यांवर कारवाई

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरुळीतपणे झाली. पहिलाच पेपर अन्‌ तोही इंग्रजी विषयाचा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधुक होती. दरम्यान, इंग्रजीचा पेपर झाला; पण पूर्ण पेपर सोडविण्यासाठी वेळ अपुरा पडल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया होती. इंग्रजी विषयात राज्यात 75 विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळून आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली.

इयत्ता बारावी परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरू झाली. सकाळी अकरा वाजता इंग्रजी पेपरची वेळ होती. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अर्धातास अगोदरच परीक्षा केंद्रात पोहोचले होते. शहरातील भावे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजसह विविध परीक्षा केंद्रांत परीक्षार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्र परिसरात आवर्जून उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारावी परीक्षेसाठी 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. इंग्रजी विषयासाठी 75 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आल्याची आकडेवारी राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. औरंगाबाद विभागात सर्वांधिक 26 विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ नाशिक विभागात 18, अमरावती 17, नागपूर 11 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. पुणे, मुंबई आणि कोल्हापूर विभागात प्रत्येकी एक विद्यार्थी, तर लातूर आणि कोकण विभागात एकही कॉपीचा प्रकार आढळला नाही.

वेळ अपुरा पडला
इंग्रजी विषयाचा पेपरवरून विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया निराशाजनक होती. इंग्रजीचा विषय सोपा होता. मात्र, पेपर पूर्ण सोडविता आला नाही. कारण वेळच अपुरा पडला. त्यामुळे शेवटचे दोन प्रश्‍नांची उत्तरे लिहिता आली नाही, अशी प्रतिक्रिया प्रतिक खाडे याने दिली. पेपर अवघड गेला. कारण पूर्ण पेपर सोडविण्याइतपत वेळच मिळाला नाही. त्यामुळे गुण कमी पडतील, असा अथर्व झाडबुके म्हणाला.

शिक्षकांचे सहकार आंदोलन कायम
कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या संपूर्ण परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. मात्र, उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेला असहकार करण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे परीक्षेनंतर बोर्डात होणारी मुख्य नियामक मंडळाची बैठक होऊ शकली नाही. परिणामी, उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेला गती मिळणार नाही. शालेय शिक्षणमंत्री व वित्तमंत्र्यांनी येत्या 26 फेब्रुवारीला बैठक बोलाविली आहे. तोपर्यंत उत्तरपत्रिकेच्या कामात असहकार आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. संतोष फासगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)