129 जिल्ह्यांमधील शहरी गॅस स्टेशनचे पंतप्रधानांकडून भूमिपूजन 

file pic

नवी दिल्ली – देशभरातील 129 जिल्ह्यांमध्ये पाईपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस वितरीत करण्यासाठीच्या शहरी गॅस स्टेशनचे पंतप्रधानांकडून आज शिलान्यास करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे देशभरातील एकचतुर्थांश लोकसंख्येपर्यंत पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचणे शक्‍य होणार आहे. उत्सर्जन रोखण्यासाठी नैसर्गिक गॅसचा वाहनांसाठी आणि स्वयंपाकासाठी अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने या प्रकल्पाच्या 10 व्या टप्प्याचा प्रारंभही आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला.

पायाभूत सुविधांच्या विकासाचा हा महत्वाचा टप्पा आहे. 10 व्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर देशभरातील 400 जिल्यांमध्ये आणि 70 टक्के लोकसंख्येद्वारे नैसर्गिक वायू इंधन म्हणून पोहोचवणे शक्‍य होणार आहे. “सीएनजी’ स्टेशनही दुपटीने जास्त म्हणजे 10 हजाराइतकी असणार आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

दहाव्या टप्प्यामध्ये आंध्रप्रदेशातील नेल्लोर, बिहारमधेल मुझफ्फरपूर, हरियाणातील काइथल, कर्नाटकातील म्हैसूर आणि गुलबर्गा, केरळमधील अल्लापुझा, मध्यप्रदेशातील कोल्लम, उज्जैन, ग्वाल्हेर आणि मोरेना, उत्तर प्रदेशातील झांशी आणि बस्ती, पंजाबमधील फिरोझपूर आणि होशियारपूर, राजस्थानातील अजमेर आणि जलोर,उत्तराखंडमधील नैनीताल आणि पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि हावडा या शहरांचा समावेश होतो आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियंत्रण मंडळार्ने काही आठवड्यांपूर्वीच 86 पैकी 78 भौगोलिक ठिकाणांना 9 व्या टप्प्यासाठी गॅस वितरणाच्या लिलावात बोली लावण्याचे परवाने दिले होते. यापैकी 65 भौगोलिक भौगोलिक ठिकाणांसाठीही पंतप्रधानांनी भूमिपूजन केले.

दरवर्षाला 142 दशलक्ष घनमीटर इतक्‍या प्रमाणात गॅसचा वापर केला जातो. दररोज त्यातील 6.2 टक्के गॅस वापरला जातो. जगाच्या सरासरी 24 टक्के इतका हा वापर आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. गॅस हे पेट्रोल किंवा डिझेलसारख्या अन्य द्रवरूप इंधनांपेक्षा स्वस्त इंधन आहे. याशिवाय अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसपेक्षाही नैसर्गिक गॅस स्वस्त आहे. देशभरातील गॅस वितरणाच्या पाईपलाईन नेटवर्कमुळे घरगुती वापरासाठीही गॅस उपलब्ध होऊ शकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)