मथुरा: राफेल विमानांच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर टीकेचे ताशेरे ओढणाऱ्या कॉंग्रेसने आणखी एका मुद्दायावरून प्रश्‍न उपस्थित केला आहे. देशाला 126 लढाऊ विमानांची आवश्‍यकता असताना केवळ 36 विमानांचीच खरेदी का केली जात आहे, असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी विचारला आहे. ही खरेदी करण्यासाठी घाई आहे का ? या विमानांच्या खरेदीसाठी सरकारने फ्रेंच कंपनीकडूनच मागणी का केली नाही, असेही त्या म्हणाल्या.

लढाऊ विमानांच्या ताफ्यातील पहिला टप्पा 2019 मध्ये दिला जाणार आहे. उर्वरित विमाने 2022 मध्ये दिली जाणार आहेत. जर या विमानांच्या खरेदीची घाई असेल, तर ती फ्रेंच कांपनीकडून 2019 मध्येच मिळू शकली असती. या व्यवहाराच्या चौकशीसाठी सरकारला संयुक्‍त संसदीय कमिटीची भीती वाटते का, असा प्रश्‍नही चतुर्वेदी यांनी विचारला आहे.

लढाऊ विमानांच्या किंमती 526 कोटींवरून 1,670 कोटींपर्यंत कशा वाढल्या आणि सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या 70 वर्षांच्या जुन्या रेकॉर्डकडे दुर्लक्ष करून हे कंत्राट 12 दिवसांच्या नवख्या कंपनीला का देण्यात आले, याचे स्पष्टिकरण पंतप्रधानांनी द्यायला हवे, असेही त्या म्हनाल्या. अब्जाधीश मित्राच्या हितासाठी सरकारने देशाच्या हिताचा त्याग केल्याचा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)