#PulwamaAttack : ‘सीआरपीएफ’च्या तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 जवान शहीद

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागात केंद्रीय राखीव सुरक्षआ दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या भीषण हल्ल्यात 12 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 40 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमीपैकी 15 जवानांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात आयईडी ब्लास्ट चा वापर करण्यात आला.  या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)