भंडाऱ्यात वाघांच्या शिकारी प्रकरणी 12 आरोपींना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

भंडारा – भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्‍यातील सीतासावंगी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेत शिवारात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी किती आरोपी या प्रकरणात गुंतले आहेत, याचा शोध वनाधिकारी घेत आहेत.

तुमसर तालुक्‍याच्या शितसावंगी परिसरात 27 जून रोजी सहा आरोपींनी शेत शिवारातून जाणाऱ्या 24 केव्हीच्या विद्युत प्रवाहातून लोखंडी तार जामिनीवर पसरवत वाघाची आणि रान डुकराची शिकार केली होती. मात्र वाघाच्या शिकरीचे बिंग त्यातीलच एका आरोपीने वन विभागाजवळ फोडले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी सापळा रचत या प्रकरणातील मुख्य आरोपी मणिराम गंगबोर याला अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी 2015 मध्येही एका वाघाची शिकार केली होती. तर 2019 मध्ये एक वाघ आणि एका बिबट्याची शिकार केली होती, अशी कबुली दिली आहे.

दरम्यान, पाच वर्षात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारी वाढल्या असून याठिकाणी आता बोटावरच मोजण्याइतके वाघ शिल्लक आहेत. गेल्या वर्षी उमरेह कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातून वाघाच्या शिकारी प्रकरणी बहेलिया टोळीचा मोरक्‍या कुख्यात वन्यजीव तस्कर कटू पारधी याला वन विभागाने उत्तर प्रदेशातून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)