12 व्या नागरी सेवा दिनाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली – कायदेशीर उद्देशाचे कार्यक्रम विषयवस्तूमध्ये अनुवादित करणे आणि दैनंदिन प्रशासनात सुराज्य कसे दिसते याचे दर्शन सामान्य नागरिकांना करुन देण्यात नागरी सेवांना आज अमाप संधी उपलब्ध आहे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत 12 व्या नागरी सेवा दिनाच्या उद्‌घाटन समारंभाला संबोधित करत होते.

स्वच्छ, सक्षम जनताभिमुख, कृतीशील प्रशासकीय नेतृत्व ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले. प्रत्येक भारतीयासाठी स्वराज्य हे अर्थपूर्ण असायला हवे आणि त्यासाठी सुराज्य अनिवार्य आहे असे ते म्हणाले. आपल्या प्रशासकीय व्यवस्था आणि प्रक्रियांचा प्रभावीपणा आणि कार्यक्षमता यांचे प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

-Ads-

अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण संशोधनावर अधिक भर दिला जात असून चलता है हा दृष्टिकोन आता चालणार नाही असे त्यांनी नमूद केले. जातीयावाद, भ्रष्टाचार, असमानता, भेदभाव, हिंसाचार यासारख्या वाईट प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्याची आपणा सर्वांची सामाईक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)