12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार करणाऱ्यास फाशीसाठी सरकारचा वटहुकूम

नवी दिल्ली – 12 वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार करणारांस फाशीची तरतूद करण्यासाठीचा वटहुकूम उद्या मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरण आणि जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ येथील अलपवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणांमुळे जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत असलेल्या सरकारने पॉस्को (प्रोटेक्‍शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्‍स्युअल ऑफेन्सेस) कायद्यात सुधारणा करण्यासाठी वटहुकूम जारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

या सुधारणेनुसार 12 वर्षांखालील बालकांवर बलात्कारात दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद होणार आहे. सध्या त्यासाठी किमान सात वर्षे तुरुंगवास, तर जास्तीतजास्त जन्मठेपेची तरतूद आहे. डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया कांडानंतर फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वटहुकूम काढण्यात आला होता. या वटहुकुमानुसार बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास वा ती विकलांग झाल्यास आरोपीला मृत्युदंड देण्याची तरतूद करण्यात आली होती. या वटहुकुमाचे पुढे फौजदारी कायद्यात रुपांतर झाले.

पॉस्को कायद्यात सुधारणा करून 12 वर्षाखालील बालकांवर बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची तरद्‌तूद करण्यासाठी सक्रिय असल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे.

कठुआ येथे 8 वर्षांच्या बालिकेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी संतप्त जनतेची मागणी होती, त्या पार्श्‍वभूमीवर सरकारचा हा वटहुकूम महत्वपूर्ण आहे.

अशाच प्रकारची घटना गुजरातमधील सुरतमध्येही घडली आहे. एका 9 वर्षांच्या बालिकेचा मृतदेह भेस्तनमधील एका क्रिकेटमैदानाच्या कडेला सापडला होता. तिच्या गुप्तांगासह शरीरावर एकूण 80 पेक्षाही अधिक जखमा होत्या. गळा दाबून हत्या करण्यापूर्वी तिच्यावर कमीत कमी आठ दिवस बलात्कार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले होते.
अशा प्रकारांना आळा घालण्यास हा वटहुकूम सर्वोत्तम उपाय असल्याचे कायदा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अशा प्रकरणात कोणाही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. आमच्या मुलींना न्याय मिळेलच. असे या घृणास्पद प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात म्हटले आहे.
असे अपराध करणारेही कोणाची तरी मुले असतात. आपल्या मुलींवर जसे आपण लक्ष ठेवतो. त्या कोठे जातात काय करतात हे विचारतो, र्तसे आपल्या मुलांवरही लक्ष ठेवले पाहिजे असे पंतप्रधानांनी काल लंडनमध्ये सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)